Sahityachi Bhasha


Price: ₹63.36
(as of Jul 10,2023 04:24:23 UTC – Details)


From the Publisher

Sahityachi Bhasha by Bhalchandra Nemade

Sahityachi BhashaSahityachi Bhasha

मानववंशशास्त्रज्ञांच्या मते सुमारे 40 लक्ष वर्षांपूर्वी मानव द्विपाद झाला. तेव्हापासून 20 लक्ष वर्षे मानवी मेंदूमध्ये भाषेचे केंद्र एक जीवशास्त्रीय गरज म्हणून विकसित होत गेले. त्यानंतर भाषेला अनुसरून मानवाची संवेदनशीलता घडत गेली. सुमारे 50 हजार वर्षांपूर्वी मानवाची समृद्ध संवेदनशीलता घडत गेली व त्याच सुमारास जगभरच्या सर्व मानवी समूहांच्या भाषा घडू लागल्या. सुमारे 10 हजार वर्षांपूर्वी ह्या सर्व भाषा संवेशवहनाच्या लवचीक, सक्षम व समृद्ध व्यवस्था म्हणून वापरल्या जाऊ लागल्या असाव्यात. यानंतर जगात निरनिराळ्या ठिकाणी भाषा लिहिल्या जाण्यासाठी लागणार्‍या तिपी चित्रांच्या स्वरूपातून अक्षरांपर्यंत उत्क्रांत होत अस्तित्वात आल्या. समाजाचे नियंत्रण भाषेच्या साधनाने होऊ लागले. त्यामुळे भाषेला एक पायाभूत सामाजिक संस्था म्हटले जाते. त्याचबरोबर मानवाची आंतरिक विचारशक्तीही भाषेच्य प्रभावाखाली तयार होऊ लागली. साहित्याच्या इतिहासात भाषेचे हे उत्क्रांत स्वरूप पाहता येते.

साहित्याची भाषा ह्या डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या प्रस्तुत पुस्तकांत वाङ्मयीन शैलीचा अभ्यास करणार्‍यांची प्राथमिक गरज भागवू शकतील, असे काही लेख सोप्या भाषेत मांडलेले आहेत. साहित्याचा अभ्यास ऐतिहासिक, चरित्रात्मक, नैतिक, मानसशास्त्रीय इत्यादी अनेक अंगांनी होत असला तरी भाषेची नीट जाण असल्याशिवाय कुठलेही साहित्याचे आकलन पूर्ण होत नाही, कारण साहित्य हे फक्त भाषेतूनच व्यक्त होत असते. साहित्याचा कोणीही अभ्यासक साहित्याच्या भाषेला कमी अधिक प्रमाणात प्रतिसाद देत असतोच.

तथापि भाषा ही केवळ पुस्तकातच आढळणारी वस्तु नसून ह्या लिखित भाषेच्या पायाखाली विशाल जनसमूहांकडून बोलली जाणारी व्यवहारातील भाषा विविध स्वरूपात अस्तित्वात असते. हे भाषेचे खरे स्वरूप लक्षात घेतल्याशिवाय साहित्यिक भाषेचे मर्म कळत नाही. भाषेची तत्त्वे, तिची जडणघडण आणि विविध रूपे यांचा शास्त्रीय अभ्यास साहित्यकृतीच्या वस्तुनिष्ठ अभ्यासाला अत्यंत उपकारक ठरतो. भाषेच्या अनेकविध रुपांच्या विशिष्ट पद्धतीने केलेल्या मांडणीला शैली असे म्हणतात. शैलीच्या अभ्यासकांना प्रस्तुत पुस्तक अत्यंत मोलाचे ठरेल.

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt Ltd; Fifth edition (1 January 2011); Saket Prakashan Pvt Ltd
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 96 pages
ISBN-10 ‏ : ‎ 8177866842
ISBN-13 ‏ : ‎ 978-8177866841
Item Weight ‏ : ‎ 530 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Importer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India Phone : 9881745605
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India Phone : 9881745605